५६ खेडी पाणी पुरवठा योजना नुतनीकरणासाठी निधीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:36 AM2017-07-21T00:36:41+5:302017-07-21T00:37:12+5:30
५६ खेडी पाणी पुरवठा योजना नुतनीकरणासाठी निधीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्र्क
नांदगाव : नांदगांव व ५६ खेडी पाणी पुरवठा योजनेच्या नूतनीकरणाच्या नवीन योजनेचे सर्वेक्षण करणे, अंदाज पत्रके व आराखडे तयार करण्यासाठी निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास उपलब्ध करून देण्याचीमागणी आमदार पंकज भुजबळ यांनी पालकमंत्री गिरीशमहाजन यांच्याकडे केली आहे.
नियोजन समीतीच्या बैठकीमध्ये त्यांनी सदर मागणी केली.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कार्यक्र माअंतर्गत प्रगतीपथावरील योजनांसाठी मंजूर योजनेच्याकिंमतीवर केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा हिस्सा यानुसार अनुदान प्राप्त होते.
राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मांतर्गत एनआरडीडब्ल्यूपी समाविष्ट असलेल्या योजनांसाठी जिल्हा नियोजन कृती आराखडा मधून निधी उपलब्ध करून घेण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी नमुद केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे योजनेचे नुतनीकरण होण्यासाठी आंदोलन देखील केले. बैठकीत आदिवासी प्रकल्प कार्यालय अंतर्गत मालेगांव, नांदगांव, येवलाच्या आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून व त्यांच्या विकासालाचालना मिळण्याच्या दृष्टीकोनातून नांदगांव येथे कळवण प्रकल्प कार्यालयाचे उपकार्यालय व्हावे अशी मागणी आमदार भुजबळ यांनी केली.
चांदवड, मनमाड, नांदगांव राज्य मार्ग अत्यंत खराब स्थितीत असून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सातत्याने अपघात होवून अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत. अपघात टाळण्याच्या दृष्टीकोनातून या रस्त्याची तात्काळ दुरु स्ती करण्यात यावी व रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम तात्काळ सुरु करावे अशी मागणी भुजबळ यांनी बैठकीमध्ये केली.