एचएएलमध्ये स्थानिक शिकाऊ उमेदवारांसाठी विशेष कोटा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:48 PM2019-07-18T12:48:34+5:302019-07-18T12:48:53+5:30

ओझर : येथील एचएएल मधील शिकाऊ उमेदवारांच्या भरतीत स्थानिक उमेदवारांना मोठ्या प्रमाणात डावलले गेल्याने त्यांना सामावून घेण्यासाठी विशेष कोटा देण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

 Demand for giving special quota for local learners in HAL | एचएएलमध्ये स्थानिक शिकाऊ उमेदवारांसाठी विशेष कोटा देण्याची मागणी

एचएएलमध्ये स्थानिक शिकाऊ उमेदवारांसाठी विशेष कोटा देण्याची मागणी

Next

ओझर : येथील एचएएल मधील शिकाऊ उमेदवारांच्या भरतीत स्थानिक उमेदवारांना मोठ्या प्रमाणात डावलले गेल्याने त्यांना सामावून घेण्यासाठी विशेष कोटा देण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
काही विशिष्ट धोरणांमुळे येथील स्थानिक उत्तीर्ण मुलांना जागा असतांना भरती होता येत नाही. इतर राज्यातील बहुतेक मुलांना पहिल्या यादीत स्थान मिळाल्याने स्थानिक मात्र बेरोजगारीच्या उंबरठ्यावर आहेत.त्यामुळे भविष्यातील उपासमारीची वेळ त्यांच्यावर येऊ नये तसेच स्थानिक भूमिपुत्रांना विशेष काळजी घेऊन समाविष्ट करावे जेणेकरून भविष्यातील नोकरीच्या संधी अधिक उपलब्ध होतील.
एचएएल मध्ये गेलेल्या शिष्टमंडळाने चंद्रकांत के.यांची भेट घेत त्यांना सदर बाब निदर्शनास आणून दिली त्यावर त्यांनी दुसर्या यादीत उत्तीर्ण झालेल्या स्थानिकांना अधिक संख्येत समाविष्ट केले जाईल असे आश्वासन दिले.
सदर निवेदन कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे व अध्यक्ष भानुदास शेळके यांनाही देण्यात आले.यावेळी युवासेना विस्तारक अमति पाटील,जिल्हाप्रमुख सुनील पाटील,उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील,युवसेनेचे तालुकाप्रमुख आशिष शिंदे,सुधीर कराड, निलेश मोरे,अजित कराटे,नरेंद्र थोरात,अमोल लवटे,अनिल सोमासे,स्वप्नील कदम,हर्षल चौधरी,हर्षल मंडलिक,विकास वाबळे,नयन चौधरी,गौरव पगार,योगेश गुंजाळ,चेतन पगार आदी उपस्थित होते.
---------------------------------------------
एचएएल ही एक नवरत्न कंपनी आहे.एचएएलमध्ये शिकलेल्या शिकाऊ उमेदवाराला कुठल्याही नोकरभरतीत सकारात्मकता दाखविली जाते.असे असताना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित बेरोजगार असताना किरकोळ धोरणांमुळे स्थानिक डावलले जात आहे.भविष्यातील मार्केटमधील स्पर्धा टिकून राहावी यासाठी हा प्रयत्न आहे. जेणेकरून भविष्यात चांगली नोकरी लागू शकते.
आशिष शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख,निफाड.

Web Title:  Demand for giving special quota for local learners in HAL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक