शिवणकर्मींना असंघटित कामगारांचा दर्जा देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 09:35 PM2020-05-15T21:35:43+5:302020-05-15T21:35:58+5:30
कळवण : शिंपी समाजातील शिवणकाम करणाऱ्या कारागिरांना असंघटित कामगारांना देण्यात येणारे आर्थिक साहाय्य व अनुदान द्यावे, अशी मागणी कळवण तालुका शिंपी समाजाने केली आहे.
कळवण : शिंपी समाजातील शिवणकाम करणाऱ्या कारागिरांना असंघटित कामगारांना देण्यात
येणारे आर्थिक साहाय्य व अनुदान द्यावे, अशी मागणी कळवण तालुका शिंपी समाजाने केली आहे. याबाबत आमदार नितीन पवार व तहसीलदार बी. ए. कापसे यांची शिंपी समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र कापडणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.
शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र बागुल यांच्या आवाहनानुसार राज्यात सर्वत्र आमदार व तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.
कळवण तालुका शिंपी समाजाच्या शिष्टमंडळाने शिंपी समाज जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र कापडणे, कळवण तालुकाध्यक्ष सुभाष देवघरे, महेश बिरारी, सुभाष देवघरे यांनी आमदारांसह तहसीलदारांची भेट घेऊन फिजिकल डिस्टन्सचे पालन करून चर्चा केली.
निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यात शिंपी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे आणि समाजाचा पिढीजात मुख्य व्यवसाय शिवणकाम व कापड व्यापार आहे. शिवणकाम करणारे काही कारागीर तसेच खेडोपाडी दर आठवड्याला गावोगावी फिरून व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाणदेखील जास्त
आहे.
-----------------------------------
शासनाकडून सवलतींचा लाभ मिळावा
गेल्या काही वर्षांपासून रेडिमेड कपड्यांचे प्रस्थ वाढल्यामुळे व मल्टिनॅशनल कंपन्यांच्या वाढत्या आॅनलाइन व्यवसायामुळे
शिवणकाम व्यवसायाला तसेच कापड व्यवसायाला घरघर लागली असून, शिवणकाम करणारा कारागीर वर्ग हाताला काम नसल्याने हवालदिल झालेला आहे. शिवणकाम कारागिरांना असंघटित
कामगारांना राज्य शासनाकडून लागू असलेल्या सर्व सवलतींचा लाभ मिळावा.
--------------------------------------------
कारागिरांच्या हाताला काम नसल्याने उपासमार
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिवणकाम दुकाने १९ मार्च पासून शासनाच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात आली आहेत व त्यामुळे शिवणकाम करणाºया कारागिरांच्या हाताला काम नसल्याने शिंपी समाज आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. त्यांची उपासमार होत असून, शिवणकाम करणाºया कारागिरांना असंघटित कामगारांना देण्यात येत असलेले आर्थिक साहाय्य / अनुदान शासन स्तरावरून त्वरित मिळवून द्यावे आणि समाजाच्या शिवणकाम करणाºया कारागिरांना न्याय द्यावा, अशी शिंपी समाजाच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.