प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना शासकीय सेवेत घेण्याची मागणी

By admin | Published: October 28, 2016 01:18 AM2016-10-28T01:18:53+5:302016-10-28T01:31:28+5:30

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना शासकीय सेवेत घेण्याची मागणी

Demand for government officials to get government help | प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना शासकीय सेवेत घेण्याची मागणी

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना शासकीय सेवेत घेण्याची मागणी

Next

 नाशिकरोड : प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना प्रमाणपत्र देण्यात यावे व त्यांना शासकीय सेवेत सामावुन घ्यावे अशी मागणी इंदिरा कॉँग्रेस अनुसूचित जाती-जमाती विभागाने दिलेल्या निवेदनात केली आहे.
विभागीय महसुल उपआयुक्त ज्ञानेश्वर खिल्लारे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र व राज्य शासनाच्या रस्ते, धरण व विविध प्रकल्पाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात
आल्या. मात्र अद्याप काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. तसेच त्यांच्या वारसांना प्रमाणपत्र देखील दिलेले नाही. एकलहरा वीज निर्मिती केंद्रासाठी जागा दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र व शासकीय सेवेत सामावुन घ्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली
आहे.
निवेदनावर कॉँग्रेस अनुसूचित जाती-जमाती विभाग जिल्हाध्यक्ष शालीग्राम बनसोडे, महिला आघाडी अध्यक्षा मंदाकिनी गायकवाड, अकीला शेख, शितल बाविस्कर, अरूणा अहिरे, सुनीता कोठुळे, छाया पाईकराव, मंगल लोखंडे, रवींद्र डांगळे, राहुल रगडे, अशोक बाविस्कर, किरण वाजे आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Demand for government officials to get government help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.