थकीत वेतन मिळण्याची ग्रामपंचायत कमर्चारी संघाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:09 PM2020-09-25T23:09:07+5:302020-09-26T00:43:05+5:30
मानोरी : ग्रामपंचायतीमध्ये सेवा बजावणारे लिपिक, शिपाई, पाणी पुरवठा कमर्चारी आदी ग्रामपंचायत कमर्चारी गेल्या पाच महिन्यापासून विना वेतन काम करत आहेत. शासन स्तरावरून ठरवून दिलेला हिस्सा आणि ग्रामपंचायतकडून दिला जाणारा वेतनाचा हिस्सा देखील मिळत नसल्याने सध्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. थकीत असलेले वेतन तात्काळ मिळण्याची मागणी येवला तालुका ग्रामपंचायतीच्या कमर्चारी संघाने केली आहे.

सध्याच्या कोरोना काळात वेळेचे बंधन न पाळता नियमित सेवा बजावूनही ग्रामपंचायत कमर्चा?र्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पुरविण्याचा महत्वाचा दुवा ग्रामपंचायत कमर्चारी आहेत. नियमित पाणीपुरवठा करणे, दिवाबत्ती, गटारी व सांडपाणी व्यवस्थापन, व नागरी सुविधा पुरविणे आदि कामे करत असून सध्या कोरोना काळात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मे २०२० पासून आजपर्यंत विना वेतन काम करावे लागत आहे. गेल्या पाच महिन्यापासून शासन स्थरावरील आॅनलाईन वेतन झाले नाही. तर उवर्रीत वेतन ग्रामपंचायतीने देणे बंधनकार असुन ग्रामपंचायत कमर्चारी वेतनाबाबत मौन पाळत आहे. शासनाने नवीन सुधारीत किमान वेतन त्वरित लागू करावे व थकीत वेतन त्वरित अदा करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कमर्चारी महासंघाचे येवला तालुकाध्यक्ष केशव ढमाले, संतोष ठोंबरे यांनी केली आहे.
--------------------
ग्रामपंचायत कर्मचाºयांना राज्य शासनाच्या हिस्याचे वेतन जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतिने कमर्चा?र्यांना त्यांच्या हिस्स्याचे वेतन तरी वेळेत अदा करणे गरजेचे आहे. परिणामी वेतन मिळत नसल्याने कमर्चा?र्याची उपासमार होत असून ही उपासमार टाळावी. राज्य शासनाने आॅनलाईन वेतन त्वरित अदा करून ग्रामपंचायत कमर्चा?र्यांना दिलासा द्यावा.
- सखाराम दुर्गुडे, जिल्हाध्यक्ष, ग्रा.पं.कमर्चारी संघ.
----------------------