शिल्लक उन्हाळी कांद्याला एक हजार रूपये अनुदान देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 05:29 PM2018-12-11T17:29:46+5:302018-12-11T17:29:50+5:30
देवळा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाळीत साठवणुक केलेला उन्हाळी कांदा शिल्लक असून ह्या कांद्याच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे अनेक शेतकरी कुटुंबातील ...
देवळा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाळीत साठवणुक केलेला उन्हाळी कांदा शिल्लक असून ह्या कांद्याच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे अनेक शेतकरी कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शिल्लक असलेल्या उन्हाळी कांद्याला शासनाने १००० रू प्रति क्विंटल अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यातील भऊर, वाजगाव, लोहोणेर, खामखेडा, सावकी, वासोळ, मेशी, दहिवड, उमराणे, वडाळे, कनकापूर, खर्डा आदी गावातील शेतकºयांनी दुष्काळ तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल हया अपेक्षेने मोठ्या प्रमाणात चाळीत कांदा साठवणुक करून ठेवला होता.
मध्यंतरी ह्या उन्हाळी कांद्याचे दर काही काळासाठी दोन हजार रु पये प्रति क्विंटलपर्यंत गेले होते. शेतकºयांना कांदा विक्र ीतून आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी हा दर योग्य होता. परंतु त्यावेळी कांदा विकण्याची घाई करू नका, यापुढेही कांद्याचे दर वाढतील असे भाकीत वर्तविले गेले.
सोशल मिडीयावर शेकडो स्वयंघोषित तज्ञांनी याबाबत उलटसुलट पोष्ट टाकून चुकीचे संदेश सर्वत्र पसरवले. यामुळे शेतकरी द्विधा मनिस्थतीत सापडून त्यांना अजून कांद्याचे दर वाढतील असा आशावाद बाळगत कांदा विक्रीसाठी योग्य परिस्थिती असतांना देखील कांद्याची विक्रि केली नाही. याबाबत अनेक शेतकर्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होते. परंतु पोळ कांदा बाजारात आल्यानंतर उन्हाळी कांद्याचे दर वाढण्याऐवजी ते सातत्याने कमी होत गेले. उन्हाळी कांद्याची मागणी घटल्यामुळे मातीमोल भावाने तो विकण्याची वेळ शेतकºयांवर आली. यामुळे हया शेतकºयांना कुटुंबातील सदस्यांची बोलणी ऐकावी लागून मनस्ताप भोगावा लागत आहे.
अनेक ठिकाणी शेतकºयांचा उद्रेक बघावयास मिळाला. तालुक्यातील सटवाईवाडी येथील शेतकरी पंढरीनाथ मेधने यांनी लिलावात उन्हाळी कांदा १०५ रुपये प्रतिक्विंटल पुकारल्यामुळे उद्विग्न होऊन विक्र ीसाठी आणलेला दोन ट्रॉली कांदा देवळा येथे पाच कंदील चौकात विंचूर प्रकाशा महामार्गावर ओतून देत शासनापर्यंत शेतकºयांच्या भावना पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
चौकट... पीक पाहणी सदोष पद्धतीने होत असल्यामुळे वरीष्ठ कार्यालयाकडे पीक लागवडीची व उत्पादनाची चुकीची आकडेवारी पाठवली जाते. काही अपवाद वगळता ग्रामीण स्तरावर काम करणारे कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जावून पाहणी न करता मागील वर्षाच्या कागदपत्रांचा आधार घेऊन पीक पाहणीची माहिती तयार करतात व वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवून देतात.
ह्या आलेल्या माहीतीच्या आधारे शासन आयात निर्यात धोरणासंबंधी निर्णय घेते. त्याचा शेतकºयांना भुर्दंड सोसावा लागतो अशी तक्र ार कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत.
चालू वर्षी दुष्काळामुळे उन्हाळी कांदा लागवडीकडे शेतकºयांनी पाठ फिरवली आहे. तयार कांद्याच्या रोपांना देखील मागणी नाही. यामुळे हा कांदा रोपे तयार करण्यासाठी केलेला खर्च देखील वाया गेला आहे. उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत.