हापूस आंब्याची मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 07:22 PM2020-06-05T19:22:21+5:302020-06-05T19:27:22+5:30
नाशिक : लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे आवक वाढल्याने व दरात थोडी घट झाल्याने हापूस आंब्याची मागणीदेखील वाढली आहे. महिन्याभरापूर्वी दोनशे रुपये किलोचा हापूस आंबा आता शंभर रुपये असा आहे.
नाशिक : लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे आवक वाढल्याने व दरात थोडी घट झाल्याने हापूस आंब्याची मागणीदेखील वाढली आहे. महिन्याभरापूर्वी दोनशे रुपये किलोचा हापूस आंबा आता शंभर रुपये असा आहे.
हापूस आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाला असून, त्याला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येत आहे. तसेच आॅनलाइन बुकिंग करून त्याची विक्रीदेखील होत आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. नाशिक शहरात दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करून शहरवासीयांना अस्सल हापूस आंबा मिळतो. यंदा मात्र कोरोनामुळे हा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. तसेच लॉकडाउन काळात मालवाहतूक होत नसल्याने नाशिक शहरात आंबा आवक कमी प्रमाणात झाली होती. मात्र काही दिवसांपासून आता आंब्याची आवक वाढली असून, ग्राहकांसाठी आंबा उपलब्ध झाला आहे. निर्यात होणाऱ्या आंब्यावर परिणाम झाला असून, हा आंबा वाशी, मुंबई, पुणे, नाशिक बाजार समितीमध्ये विक्री होत आहेत. सध्या बाजारात केसर, बदाम, लंगडा आदी विविध जातींचे आंबे दाखल झाले असून, हापूस आंब्यालादेखील मोठी मागणी असून, त्याचा एक पेटीचा दर आठशे ते बावीसशे रुपये आहे, तर किलोचा दर शंभर रुपये असा आहे.