नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 09:32 PM2020-05-15T21:32:04+5:302020-05-15T23:37:07+5:30

दिंडोरी : तालुक्यातील उमराळे येथे गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची खासदार डॉ. भारती पवार यांनी दिंडोरी तालुक्याचे तहसीलदार कैलास पवार, तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, विजय पवार यांच्या समवेत पाहणी केली.

Demand for help to affected farmers | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी

Next

दिंडोरी : तालुक्यातील उमराळे येथे गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची खासदार डॉ. भारती पवार यांनी दिंडोरी तालुक्याचे तहसीलदार कैलास पवार, तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, विजय पवार यांच्या समवेत पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना शेतपिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळवून देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
दिंडोरी तालुक्यातील अस्वलीपाडा, अहिवंतवाडी, चामदरी, पवारणीचा पाडा, कोल्हेर, पिंपरी अंचला, चौसाळे, पांडाणे, माळे दुमाला, अंबानेर, पुणेगाव, सारसाळे आदी भागात जोरदार पावसाने वादळी वाºयासह गारपिटीमुळे शेतकºयांच्या तोंडचा घास हिरावला गेला असल्याने अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तासभर चाललेल्या वादळी अतिवृष्टीत गारपीटदेखील मोठ्या प्रमाणावर झाल्याने कांदा, गहू, बाजरी तसेच द्राक्षपिकांना गारांचा मार लागला आहे. या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना काढून ठेवलेला कांदा झाकताना शेतकºयांची पुरती धावपळ उडाली होती. पांडाणे, पुणेगाव, अंबानेर, चौसाळे व पिंगळवाडी परिसरात पावसासोबत गारा पडल्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावला आहे.
-----------------------
अगोदरच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले असताना शेतकºयांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यात अवकाळी वादळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, तत्काळ पंचनामे करून सरकारने नुकसानग्रस्त शेतकºयांना मदतीचा हात देऊन आधार द्यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
- डॉ. भारती पवार, खासदार,
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ

Web Title: Demand for help to affected farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक