मांगबारी घाटातील उंचवटा काढण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 08:01 PM2019-07-28T20:01:04+5:302019-07-28T20:02:16+5:30

खामखेडा : नामपुर सटाणा खामखेडा कळवण नाशिक राज्य महामार्ग क्र माक सतरा वरील मांगबारी घाटातील उंचवटा कमी करण्यात यावा आशी मागणी वाहनधारका्रकडून करण्यात येत आहे .

Demand for higher removal of Mangabari deficit | मांगबारी घाटातील उंचवटा काढण्याची मागणी

मांगबारी घाटातील उंचवटा काढण्याची मागणी

Next
ठळक मुद्देया रस्त्यावरु न मोठ्या प्रमाणात नोकरदार ये-जा करतात.

खामखेडा : नामपुर सटाणा खामखेडा कळवण नाशिक राज्य महामार्ग क्र माक सतरा वरील मांगबारी घाटातील उंचवटा कमी करण्यात यावा आशी मागणी वाहनधारका्रकडून करण्यात येत आहे .
साक्र ी, नामपुर, सटाणा, खामखेडा, बेज, कळवण, नांदुरी, नाशिक हा राज्य महामार्ग नांदुरी गडावर व नाशिकला जाण्यासाठी भाविकांना जवळचा अल्याने या रस्त्यावरु न नेहमी वाहनाची वर्दळ असते. तसेच या रस्त्यावरु न मोठ्या प्रमाणात नोकरदार ये-जा करतात.
या राज्य महामार्गावर पिंपळदर, खामखेडा गावाच्या दरम्यान मांगबारी घाट असून सदर घाटातील माथ्यावरील उंच भागामुळे खालुन घाट चढून येणारे वाहन जोरात असते. तर सटाणाकडून येणार रस्ता चढावाचा असल्याने खामखेडाहुन या मांगबारी घाटातून सटाणाकडे येणारा रस्ता चढावाचा असल्याने समोरून येणारे वाहन उंच भाग असल्याने दिसत नाही. त्यामुळे अचनक समोर येणाऱ्या वाहनामुळे गोंधळ होऊन नेहमी अपधात होतात. घाटाचा रस्ता असल्याने खालुन येणारे वाहन जोरात असते. त्याचप्रमाणे वरु न येणारे वाहन उतारचा रस्ता असल्याने जोरात असते. त्यामुळे अपधात होतात. तेव्हा सदर रस्त्यावरील मांगबारी घाटातील माथ्यावरील उंचवटा कमी करण्यात यावा आशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Demand for higher removal of Mangabari deficit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.