दिव्यांगांना घरकुल देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:18 AM2021-07-07T04:18:13+5:302021-07-07T04:18:13+5:30

सिन्नर : दिव्यांगांना घरकुल व खावटी भेटत नसल्याने प्रहारच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांची भेट घेऊन निवेदन ...

Demand for housing for the disabled | दिव्यांगांना घरकुल देण्याची मागणी

दिव्यांगांना घरकुल देण्याची मागणी

Next

सिन्नर : दिव्यांगांना घरकुल व खावटी भेटत नसल्याने प्रहारच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

तालुक्यात धनाढ्यांना घरकुल मिळत असून, दिव्यांगांना मिळत नाही. समाज कल्याण विभागात काम करणारे परदेशी व गावोगावचे ग्रामसेवक दिव्यांगांना योग्य माहिती व सहकार्य करीत नसून, विनाकारण चकरा मारायला लावतात. ग्रामीण भागातील सवलतीपासून वंचित असणाऱ्या दिव्यांगांना न्याय द्या. गावातच अपंगांची प्रकरणे बनवावीत, अन्यथा दिव्यांगांना घेऊन पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा ‘प्रहार’च्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, दिव्यांग संघटनेच्या तालुकाध्यक्ष गीता पानसरे, संघटक बापू सानप, ‘प्रहार’चे शहराध्यक्ष दौलत धनगर, संदीप लोंढे, रोहिणी वनवे, सुमन मानेवर, जयदेव मानेवर, ज्ञानेश्वर वनवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

इन्फो...

गावातच कागदपत्रांची पूर्तता करणार : मुरकुटे

गटविकास अधिकारी मुरकुटे यांनी परदेशी यांना बोलावून झाडाझडती घेतली. तसेच दिव्यांगांना घरकुल, खावटी योजना मार्गी लावणार आहे. यापुढे गावातच ग्रामपंचायतीत ग्रामसेवकांना कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याच्या सूचना देतो, असे बीडीओ मुरकुटे यांनी प्रहारच्या शिष्टमंडळास सांगितले.

फोटो - ०६ सिन्नर दिव्यांग

दिव्यांगांना घरकुल देण्याच्या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांना देताना तालुकाध्यक्ष शरद शिंदे. समवेत दिव्यांग बांधव.

060721\06nsk_27_06072021_13.jpg

दिव्यांगांना घरकुल देण्याच्या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांना देतांना तालुकाध्यक्ष शरद शिंदे. समवेत दिव्यांग बांधव.

Web Title: Demand for housing for the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.