बागलाणच्या पश्चिम भागातील अवैध व्यवसाय रोखण्याची मागणी
By admin | Published: October 28, 2015 11:04 PM2015-10-28T23:04:37+5:302015-10-28T23:12:05+5:30
ग्रामस्थांना त्रास : गावाची शांतता धोक्याततळवाडे
दिगर : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील मोरकुरे या आदिवासी गावालगत हत्ती नदीकिनारी जुगाऱ्यांचे साम्राज्य वाढले असून, त्याचा त्रास परिसरातील ग्रामस्थांना होत असल्याने पोलिसांनी या जुगाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मोरकुरेचे सरपंच काळू धुमणे यांनी केली आहे.
मोरकुरे गावालगत हत्ती नदीकिनारी गेल्या अनेक वर्षांपासून सर्रास जुगार खेळला जात असून, त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. परिसरातील तळवाडे, मोरकुरे, भवाडे, पठावे, चिंचपाडे, सारपाडे, मळगाव येथील तरुणांपासून तर वृद्धांपर्यंत जुगाराच्या विळख्यात सापडले असल्याने गावाची शांतता धोक्यात आली आहे.
दोन-तीन दिवस मोलमजुरी करून जमविलेला पैसा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खर्च न करता जुगारावर खर्च केला जात असल्याने महिलावर्ग पुरता वैतागला
आहे. त्यातच गावातील तरुणांमध्येही व्यसनांचे प्रमाण प्रचंड वाढल्याने गावामध्ये तंटे वाढत आहेत. एकेकाळी कृष्णाजी माउलींच्या कृपाशीर्वादाने वारकरी संप्रदायाकडे वळलेला तरुण सध्या सट्टा-
जुगाराच्या विळख्यात गुरफटला जात आहे. तरुणांना यापासून वाचविण्यासाठी पोलिसांनी जुगार अड्यावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. (वार्ताहर)बागलाण तालुक्यातील मोरकुरे येथे सुरू असलेला जुगाराचा अड्डा.