करपा रोगाच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या भातशेतीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 03:13 PM2020-09-25T15:13:21+5:302020-09-25T15:14:15+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही शेतकºयांच्या बांधावर नुकसान झालेल्या भात पिकांची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी आला नाही, त्यामुळे शेतकरी तीव्र नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आदिवासी नॅशनल फेडरेशनच्या वतीने तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले आहे.

एकीकडे कोरोनाचे संकट त्यात कर्जबाजारी होऊन का होईना शेती मशागतीची कामे पूर्ण करून भात शेतीची लागवड केली आणि मध्येच आता करपा रोगाचे शेतकºयांच्या मुळावर आलेले उभे संकट यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. शेतकºयांना फक्त शासनाच्या पंचनामे आणि नुकसान भरपाईचीच आशा आहे. नुकसान झालेल्या भात शेतीची प्रशासनाने प्रत्यक्षात पाहणी करून सदर नुकसानग्रस्त पिकांची शासनाने पंचनामे करून शेतकरी वर्गाला दिलासादायक नुकसानभरपाई द्यावी या मागणीचे निवेदन फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीराम लहामटे यांनी निवेदनाद्वारे इगतपुरीचे तहसीलदार यांना दिले.
या वेळी पंचायत समितीचे सदस्य सोमनाथ जोशी, आदिवासी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम वारघडे, राम शिंदे, गणेश कवटे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
प्रतिक्रि या...
एकीकडे शेतकरी समृद्ध झाला असा बडेजाव अनेक नेतेमंडळी करतात परंतू करपा रोगामुळे अनेक शेतकर्यांची भात शेती संपुष्टात आली तरी सुद्धा एकही स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकारी अद्यापही शेतकर्यांच्या बांधावर सुद्धा गेला नाही. प्रशासनाने त्विरत प्रत्यक्षात नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत व शेतकर्यांना दिलासादायक नुकसानभरपाई द्यावी तरच खर्या अर्थाने शेतकरी समृद्ध होईल.
- डॉ. श्रीराम लहामटे. युवा राज्य अध्यक्ष, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र.