पंचवटी एक्स्प्रेस त्वरित सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:15 AM2020-06-29T00:15:51+5:302020-06-29T00:16:48+5:30
लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली पंचवटी एक्स्प्रेस त्वरित सुरू करण्याची मागणी रेल परिषदेने मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना केली आहे.
नाशिकरोड : लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली पंचवटी एक्स्प्रेस त्वरित सुरू करण्याची मागणी रेल परिषदेने मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना केली आहे. मध्य रेल्वे व्यवस्थापकांना रेल्वे परिषदेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, नाशिक शहरासह जिल्ह्यातून नोकरदार पंचवटी एक्स्प्रेसने मुंबईला रोज अपडाऊन करतात.
सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये महिन्यातून काही दिवस उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. एसटी, टॅक्सी बंद असल्याने त्यांना मुंबईला जाता येत नाही. त्यामुळे त्यांच्या नोकºया धोक्यात आल्या आहेत. प्रवासी सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियमांचे पालन करून रेल्वेला सहकार्य करतील, अशी ग्वाही पत्रात देण्यात आली आहे. पत्रावर परिषदेचे अध्यक्ष गुरुमितसिंग रावल, जयराम दलवानी, स्वानंद सोनार, अमोल गाडगे, तुषार भवर, गोविंद वागे, आरती माळी आदींच्या सह्या आहेत.