मतदान केंद्र निहाय लसीकरणमोहीम राबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 09:04 PM2021-05-18T21:04:54+5:302021-05-19T00:50:06+5:30
येवला : तहसील कार्यालयातील निवडणुक शाखे मार्फत मतदान केंद्र निहाय कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी तालुक्यातील नागरीक व ...
Next
ठळक मुद्देयेवला : तहसील कार्यालयातील निवडणुक शाखे मार्फत मतदान केंद्र निहाय कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी तालुक्यातील नागरीक व सामाजिक कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.
येवला : तहसील कार्यालयातील निवडणुक शाखे मार्फत मतदान केंद्र निहाय कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी तालुक्यातील नागरीक व सामाजिक कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.
कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण होणे गरजेचे आहे. मर्यादित लसीकरण केंद्रांमुळे लसीकरणासाठी मोठी गर्दी होते. तर अशाच पद्धतीने लसीकरण सुरू राहिले तर बराच अवधी जाईल. मतदान केंद्र निहाय लसीकरण मोहीम राबवण्यात आली तर लवकरच सर्वांना लस मिळेल असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर सुभाष गांगुर्डै, योगेश सोनवणे, सुमित थोरात, सचिन सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.