नार-पार प्रकल्पा मध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 03:27 PM2018-10-18T15:27:26+5:302018-10-18T15:27:38+5:30
साकोरा (प्रतिनिधी) - नांदगाव तालुका भयंकर दुष्काळाच्या आगीत होरपळला जात असून वर्षानुवर्षांचे दुष्काळी संकट दूर करण्यासाठी नार-पार जलप्रकल्प हाच एकमेव पर्याय उरलेला आहे. त्यासाठी नार-पार प्रकल्पाच्या डी.पि.आर.मध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश करण्यासाठी शासनाने तातडीने पाउल उचलावे अशी मागणी तालुका सर्वपक्षीय नार-पार जलहक्क समितीने जनसभेतून मागणी केली.

न्यायडोंगरीचे जगुनाना पाटील ,,नागापूरचे सुधाकर पवार ,विशाल वडघुले , निलेश चव्हाणआदींनी पाण्याअभावी तालुक्याचा विकास खुंटला असून, नार-पार चे पाणी मिळाले तर ग्रामीण भागातही लघु औद्योगिक वसाहती निर्माण होऊन तरु णांची बेरोजगारी दूर होईल असा आशावाद व्यक्त केला.
समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांनी संपूर्ण नार-पार प्रकल्पाची सखोल माहिती देऊन, जनलढ्यासाठी जनतेने संघिटत होण्याचे आवाहन केले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष परसराम शिंदे यांनी बैठकीचे आयोजन केले. ज्येष्ठ नागरिक अशोक जाधव यांनी आभारप्रदर्शन केले.सावरगाव मधील विलास शेलार ,अशोक सोनावणे, सुरेश जाधव , जिभाऊ पानगव्हाणे, पोपट राठोड, धोंडीराम वाघ, दत्तात्रय चव्हाणके .कैलास खालकर, धर्मराज लाड, ज्ञानेश्वर धात्रक आदीं ग्रामस्थ उपस्थित होते.