खेडगाव- शिंदवड रस्त्यावरील फरशीची उंची वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 05:47 PM2020-09-13T17:47:11+5:302020-09-13T17:47:39+5:30
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव शिंदवड रस्त्यावरील दोन फरशी असुन थोडा जरी पाऊस झाला तरी त्यावरु न पाणी वाहते त्यामुळे परिसरातील गावांता संपर्क तुटतो यामुळे विद्यार्थी, शेतकरी, वाहनधारक यांना मनस्ताप सहन करावा लागतो मागील दोन वर्षापुर्वी पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने एक शेतकरी वाहुन गेला होता. त्यावेळी सर्व आजी माजी लोक प्रतिनिधी व राजकीय पुढाºÞयांनी फरशीची पाहणी करु न उंची वाढुन संरक्षक कठडे बसविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु घटनेला दोन वर्ष उलटुनही फरशीचे काम झाले नाही.

शिंदवड-खेडगाव,खेडगाव-वडनेर भैरव, खेडगाव-बहादुरी,खेडगाव-गोंडेगाव या रस्त्याची चाळण झाली असुन खड्यातून वाट काढत रोज वाहनधारक प्रवास करतात. रस्त्यांचे काम होत नसल्याने शिंदवड येथील ग्रामस्थांनी आठ दिवसापुर्वी रस्त्यातील खड्यात झाडे लावुन सरकारचा निषेध केला व लोकप्रतीनीधी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु खासदार, आमदार अन्य कोणीही या आंदोलनाची दखल घेतली नाही. कुठलीही चर्चा केली नाही. त्यामुळे शिंदवड येथील आंदोलनकर्त्यांनी शिंदवड दिंडोरी तालुक्यात येते की नाही असा सवाल करत लोकप्रतिनीधी व संबंधित अधिकारी व सरकारवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.