सटाण्यात पोलीस कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 07:21 PM2020-09-24T19:21:33+5:302020-09-25T01:18:58+5:30
सटाणा : येथील पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या ७२ गावांतील सुमारे दोन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी अवघ्या ३२ पोलिसांना सांभाळावी लागत आहे.
सटाणा : येथील पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या ७२ गावांतील सुमारे दोन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी अवघ्या ३२ पोलिसांना सांभाळावी लागत आहे. पोलीस ठाणे निर्मितीपासून मंजूर असलेल्या पदांमध्ये एकदाही वाढ न झाल्याने झपाट्याने वाढलेल्या लोकसंख्येसाठी पोलिसांची संख्या अत्यंत तोकडी असून, कायदा सुव्यवस्था राखताना कसरत करावी लागते. यामुळे सटाणा पोलीस ठाण्यात नवीन पोलीस कर्मचाऱ्यांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरागध्यक्ष विजयराज वाघ यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीस महानिरीक्षक दिघावकर यांनी पोलीस अधीक्षक पाटील यांच्याशी संपर्क साधून सटाणा पोलीस ठाण्यात १५ नवीन पोलीस कर्मचाºयांची नेमणूक करण्याबाबत सांगितले. यावेळी वाघ यांच्यासमवेत माजी नगरसेवक फईम शेख, अल्ताफ कादर, प्रीतेश जाधव आदी उपस्थित होते.