राजापूर येथे तीव्र पाणी टंचाई टॅँकर वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 10:06 PM2019-08-03T22:06:37+5:302019-08-03T22:07:08+5:30
राजापूर : येवला येथे सध्या चांगला पाऊस झाल, पण तालुक्यातील राजापूर येथे अजून चांगला पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी व नागरीक हैराण झाले आहे.
राजापूर : येवला येथे सध्या चांगला पाऊस झाल, पण तालुक्यातील राजापूर येथे अजून चांगला पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी व नागरीक हैराण झाले आहे.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी वरून राजाचे आगमन झाले नसल्याने राजापूर गाव व वाड्या,वस्त्यावर पिण्याच्या पाण्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.
तहान भागविण्यासाठी व जनावरांना पिण्यासाठी राजापूर व पूर्वेकडील भागात पाणी टंचाई असल्याने टॅँकर दोन दिवसापासून आलेले नाहीत, त्यामुळे राजापूर व सोमठाणजोश या दोन गावे व वाड्या, वस्त्यावर पावसाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
ही पाणी टंचाई दूरकरण्यासाठी टॅँकरमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
राजापूर येथील वाड्या,वस्तीवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राजापूर हे गाव मोठे असून येथे दोन टॅँकरने पाणी पूरवठा सुरू आहे. त्यामध्ये गावासाठी दोन तर वाड्या,वस्त्यावरील लोकांना दोन खेपा सध्या सुरू आहेत. परंतू दोन दिवसापासून टॅँकरच आले नसल्याने राजापूर येथे पिण्यासाठी पाणी टंचाई भयानक परिस्थिती झाली आहे. शिवाय पाऊसच नसल्याने परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या असून पाणी कोठे मिळेल या चिंतेने येथील जनता हैराण झाले आहे.
अलगट वस्ती, हवालदार वस्ती, भैरवनाथवाडी या तीन वाड्या मोठ्या आहे. तर काही वस्त्या, वाड्या लहान आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीला पाणी वाटप करतांना कसरत करावी लागत आहे. जेवढे गाव आहे, त्यापेक्षा जास्त लोक वाड्या,वस्तीवर राहत असल्याने पाणी टंचाई या समस्येने जनता हैराण झाली आहे.
गाव दुष्काळी मंडलात असूनही शासनाने पाहीजे त्याप्रमाणे पाणी मिळत नाही व अजून राजापूर येथे मोठा पाऊस झाला नसल्याने कधी एकदाचा पाऊस पडेल अन पिण्यासाठी पाणी मिळेल अशी आशा येथील जनतेला लागली आहे.
सध्या पाण्याचे टॅँकर पुरत नाही एका वस्त्यावर नंबरप्रमाणे टॅँकर गेला कि दोनशे ते चारशे लीटरचे पाणी मिळते. त्यामुळे लवकरच आणखी टॅँकर सुरू करण्यात यावे किंवा गावासाठी व वाड्या वस्त्यावर टॅकरच्या खेपामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी सरपंच सुनिता माळी, उपसंरपच शरद वाघ, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बोडखे, पोपट आव्हाड, बबन अलगट, भारत वाघ, देविदास जाधव, काशिनाथ चव्हाण, सोपान आव्हाड, माधव आगवण आदी ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या येवला तालूक्यात चांगला पावसाची नोंद झाली असे हे शासनाला खरे वाटते पण राजापूर येथे विहिरी बंधारे कोरडे ठाक आहेत. टॅकरच्या पाण्यावर येथील जनतेची तहान भागवावी लागत आहे.
- शरद वाघ, उपसंरपच, राजापूर.