स्नानाची वेळ वाढवून देण्याची मागणी

By admin | Published: September 7, 2015 11:14 PM2015-09-07T23:14:02+5:302015-09-07T23:15:59+5:30

प्रस्ताव : त्र्यंबकला आखाडा परिषदेची बैठक

Demand for increased bath time | स्नानाची वेळ वाढवून देण्याची मागणी

स्नानाची वेळ वाढवून देण्याची मागणी

Next

 त्र्यंबकेश्वर : आखाड्यांच्या शाहीस्नानाच्या वेळा पोलीस व जिल्हा प्रशासनाने वाढवून द्याव्यात यासह इतर मागण्यांचा प्रस्तावाला सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या सर्व आखाड्यांच्या बैठकीत सर्व सदस्यांनी हरहर महादेवच्या जयघोषात हात वर करून एकमुखाने मान्यता दिली. या संबंधात प्रशासनाने आखाडा परिषद व प्रशासन यांची संयुक्त बैठक ८ ते ११ सप्टेंबर दरम्यान बोलवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली़
त्र्यंबकेश्वर येथे नीलपर्वत येथील श्रीपंच दशनाम जुना आखाडा येथे त्र्यंबकेश्वरमधील दहाही आखाड्यांची बैठक संपन्न झाली़ अध्यक्षस्थानी त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी होते़ त्र्यंबकेश्वरच्या साधू आखाड्यांच्या शाहीस्नानाचा गॅझेट सन १८00 सालातील त्यावेळच्या साधूंच्या संख्येला अनुसरून दिला आहे. आता आखाड्यांतील साधूंची संख्या वाढली आहे. भाविकांची संख्यादेखील दहापट वाढली आहे आणि स्नानाची वेळ तीच आहे. प्रत्येक आखाड्याने कुशावर्तावर पोहचण्याची वेळ, स्नानाची वेळ, कुशावर्तावरून निघण्याची वेळ, मंदिरात जाण्याची वेळ आदि वेळा निश्चित असल्या तरी इतर आखाडे लगेच कुशावर्तावर येत असतात. त्यामुळे प्रत्येक आखाड्यांच्या देवता, महामंडलेश्वर, श्री महंत, साधू महात्मा यांना स्नानासाठी वेळ पुरत नाही. त्यामुळेच प्रशासनाने आपल्या अधिकारात वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दि. २८ आॅगस्ट रोजी कुशावर्त तीर्थ व परिसरात साधू व आखाड्यांच्या भाविकांना स्नानासाठी रोखले होते़ यावेळी आखाड्यांच्या शाही मिरवणुकीत सामील झालेल्या भाविकांना, आखाड्याचे पुरोहित ब्राह्मण यांनाही स्नानासाठी सोडावे. आखाड्याच्या शाही मिरवणुकीत सामील असलेल्या पुरुष, महिला, माता-भगिनींची पोलिसांनी ओढाताण केली. असे पुन्हा होता कामा नये. तसेच माध्यम प्रतिनिधींची एका ठिकाणी व्यवस्था करून द्यावी. यासह इतर ठराव यावेळी संमत करण्यात आले.
बैठकीस महंत हरिगिरी, महंत गोविंदानंद ब्रह्मचारी महंत शंकरानंद सरस्वती (आनंद आखाडा), रामानंदपुरी (निरंजनी), प्रेमगिरीजी (आखाडा परिषद सचिव, जुना आखाडा), उमा भारती (जुना), आशिशगिरीजी (निरंजनी), रमेशगिरीजी (महानिर्वाणी), राजेंद्रसिंहजी (निर्मल), जगतारमुनीजी, त्रिवेणीदासजी (नया उदासीन), प्रेमानंदजी (उदासीन बडा), सत्यगिरीजी (आवाहन आखाडा) आदि संत-महंत उपस्थित होते.
दरम्यान, बैठकीचे इतिवृत्त लिहिण्यापूर्वी गोदावरीत तळेगाव धरणाचे पाणी घेण्याकरिता लग्नस्तंभ डोंगराला बोगदा पाडून पाइपलाइनद्वारे पाणी घ्यावे व शहरातील सेव्हरेज लाइन शहरापासून दूर न्यावी, असे प्रस्ताव मंजूर केले. (वार्ताहर)
पालखेड येथे नेत्र तपासणी शिबीर
दिंडोरी : पालखेड बंधारा ता . दिंडोरी येथे आदित्या ज्योत हॉस्पिटलच्या वतीने , नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले.
या शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले . या शिबिरात महिला तसेच ग्रामस्थ त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी ही भाग घेऊन नेत्र तपासणी केली . त्यात सतरा जणांना चष्म्याचे वाटप करण्यात आले . डॉ . शेख यांनी रु ग्णांना माहिती दिली. (वार्ताहर)

या प्रसंगी सरपंच सुनिल हेंद्रे , उपसरपंच उत्तम जाधव , साहेबराव गोतरणे , संदीप गायकवाड , भारत गोतरणे , यादव कोकाटे यांनी ग्रामपंचायत वतीने आभार मानले . डॉ . अशोक भालेराव , विमल त्रीभवने , राहुल शिंदे , माया गवारे , सुनिता वाघ वैष्णवी सातवे , मीना शेतवास यांनी कार्यक्र म यशिस्वतेसाठी प्रयत्न केले .

Web Title: Demand for increased bath time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.