हरणबारी कालव्यासाठी वाढीव निधी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 02:37 PM2020-07-23T14:37:30+5:302020-07-23T14:37:52+5:30

औदाणे : बागलाण तालुक्यातील हरणबारी उजवा कालवा व केळझर चारी क्र मांक आठ च्या कामासाठी वाढीव मंजुरी मिळावी अशी मागणी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे पंचायत समितीच्या सभापती इंदुबाई ढुमसे , उपसभापती कान्हू आहिरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Demand for increased funding for Haranbari canal | हरणबारी कालव्यासाठी वाढीव निधी देण्याची मागणी

हरणबारी कालव्यासाठी वाढीव निधी देण्याची मागणी

Next

औदाणे : बागलाण तालुक्यातील हरणबारी उजवा कालवा व केळझर चारी क्र मांक आठ च्या कामासाठी वाढीव मंजुरी मिळावी अशी मागणी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे पंचायत समितीच्या सभापती इंदुबाई ढुमसे , उपसभापती कान्हू आहिरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की . पंचायत समितीची नवीन इमारत बांधण्यासाठी शासनाने दिलेली जागा नावावर होऊन नवीन इमारतीस मंजुरी मिळावी, युतीच्या काळात मंजूर झालेल्या हरण बारी उजवा कालवा केळझर चारी क्र मांक आठच्या कामासाठी वाढीव मंजुरीसाठी जलसंपदामंत्री यांच्याकडे पाठपुरावा करावा, कृषी विभागाच्या योजना फळबाग शेततळे, शेती साहित्य पिक विम्यास शासनाने लावलेले निकष अट शर्ती कमी होऊन शेतकऱ्यांना लाभ मिळावा, कृषी विभागाच्या योजनांना प्राधान्य मिळावे असे नमूद केले आहे.

Web Title: Demand for increased funding for Haranbari canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक