मालेगावी आधार केंद्रांच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:14+5:302021-07-14T04:17:14+5:30
मालेगाव : शहरातील आधार केंद्रांवर अवाजवी शुल्क आकारून विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढून दिले जात आहे. केंद्रांकडून पालकांची आर्थिक लूट ...
मालेगाव : शहरातील आधार केंद्रांवर अवाजवी शुल्क आकारून विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढून दिले जात आहे. केंद्रांकडून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शान-ए-हिंद यांनी तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड शाळांनी बंधनकारक केले आहे. परिणामी, शहरातील आधार केंद्रांवर आधार कार्ड काढण्यासाठी पालकांची गर्दी होत आहे. पालकांच्या अज्ञानाचा फायदा घेत, काही केंद्रांकडून ३०० ते ४०० रुपये शुल्क उकळले जात आहे. आधार कार्ड केंद्रांकडून फसवणूक केली जात आहे. शासनाने निश्चित केलेल्या शुल्कानुसारच शुल्क आकारणे बंधनकारक करावे. शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात आधार केंद्र सुरू करून पालकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी नगरसेविका शान-ए-हिंद यांनी केली आहे.
फोटो फाईल नेम : १२ एमजेयुएल ०७ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव शहरातील वाढीव शुल्क आकारणाऱ्या आधार केंद्रांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना देऊन चर्चा करताना महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शान-ए-हिंद.
120721\12nsk_36_12072021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.