वीज मंडळाने केलेल्या कामाच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 01:23 IST2020-08-02T00:01:11+5:302020-08-02T01:23:57+5:30
येवला : तालुक्यातील धुळगाव शिवारात वीज मंडळाने केलेल्या कामाच्या चौकशी करण्यात यावी, अशी मागणी धुळगावच्या ग्रामस्थांनी येवला विभागाच्या उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वीज मंडळाने केलेल्या कामाच्या चौकशीची मागणी
येवला : तालुक्यातील धुळगाव शिवारात वीज मंडळाने केलेल्या कामाच्या चौकशी करण्यात यावी, अशी मागणी धुळगावच्या ग्रामस्थांनी येवला विभागाच्या उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
धुळगाव शिवारातील वालूबाई भगवान आहेर या शेतात काम करत असताना त्यांच्यापासून केवळ १० फूट अंतरावर वीजवाहिनी अचानक तुटून जमिनीवर पडली. दैव बलवत्तर म्हणून त्या बचावल्या. धुळगाव शिवारातील या मुख्य वीज मंडळाच्या कामाच्या चौकशीची मागणीलाइन व डीपीचे काम काही महिन्यांपूर्वी झाले असून, यात दर्जाहीन साहित्य वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या कामांची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर प्रवीण आहेर, अमोल आहेर, बापू गायकवाड, सागर आहेर, मंगेश आहेर, देविदास गायकवाड, शशिकांत आहेर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.