उद्यानात सीसीटिव्ही बसविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:16 AM2021-02-11T04:16:32+5:302021-02-11T04:16:32+5:30

गणेशचौक भागत वाढत्या चोऱ्या तसेच परिसत असलेल्या बलोद्यानाची कायम होणारी नासधूस व साहित्य चोरी रोखण्यासाठी स्थानिक नागरिकांनी बैठक घेतली. ...

Demand for installation of CCTV in the park | उद्यानात सीसीटिव्ही बसविण्याची मागणी

उद्यानात सीसीटिव्ही बसविण्याची मागणी

Next

गणेशचौक भागत वाढत्या चोऱ्या तसेच परिसत असलेल्या बलोद्यानाची कायम होणारी नासधूस व साहित्य चोरी रोखण्यासाठी स्थानिक नागरिकांनी बैठक घेतली. यामध्ये बलोद्यानात महापालिकेने सीसीटीव्ही बसवावे व एन ८ सेक्टर मधील रहिवाशांतर्फे सीसीटीव्ही लावण्यात यावे असे ठरविण्यात आले. त्यानुसार विभागीय अधिकारी मयुर पाटील व शिवसेना महिला नगरसेवक कल्पना पांडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल घेत विभागीय अधिकारी पाटील व नगरसेवक पांडे यांनी उद्यान व परिसराला भेट देत पाहणी केली. या भागात पोलीस गस्त वाढवून, क्यूआर कोड बसवावे अशी मागणी छत्रपती सेनाचे तुषार गवळी, डॉ विशाल गवळी, पुंडलिक जगताप, तुषार जगताप, निवृत्ती वाघ , शरद गांगुर्डे, भूषण सावळे, राहुल आहेर, नारायण पवार, लीलाधर गवळी, सचिन खैरे आदींनी केली.

Web Title: Demand for installation of CCTV in the park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.