त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:18 AM2021-08-19T04:18:43+5:302021-08-19T04:18:43+5:30
जनआशीर्वाद यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, त्र्यंबकेश्वर हा आदिवासी ...
जनआशीर्वाद यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, त्र्यंबकेश्वर हा आदिवासी व मागासवर्गीय तालुका आहे. या ठिकाणी मागासवर्गीयांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून, त्र्यंबकेश्वर हे धार्मिक व पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे भाविक व पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात येत असते. एखादी दुर्दैवी घटना किंवा अपघात घडल्यास व रुग्ण गंभीररीत्या जखमी झाल्यास येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभाग नसल्याने त्या गंभीर रुग्णास नाशिक जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात येते. हे रुग्णास व नागरिकांच्या गैरसोयीचे आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याची घटना घडल्या आहेत. नागरिकांना नाइलाजास्तव खासगी रुग्णालयांमध्ये महागडे उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग झाल्यास येथील नागरिकांची सोय होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वरच्या मंजूर विकास आराखड्यातील जागा आरक्षण क्र. ३७ हे हॉस्पिटलकरिता आरक्षित केलेले आहे. त्र्यंबकेश्वरची भौगोलिक परिस्थिती व येणारे पर्यटक व आदिवासी व मागासवर्गीय बांधव यांच्याकरिता अद्ययावत सर्व सोयींयुक्त हॉस्पिटल होणे गरजेचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे, मोहन सोनवणे, हरिष तुपलोंढे, अनिल गांगुर्डे, कृष्णा काशीद, श्याम कोथमिरे, योगेश रोकडे, अविनाश जाधव, अंकुश सोनवणे, भूषण सोनवणे, संदीप दोंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो- १८ वंचित आघाडी
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ.
180821\18nsk_21_18082021_13.jpg
फोटो- १८ वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ.