खरीप हंगामातील पिक विमा योजना सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 06:47 PM2020-06-20T18:47:19+5:302020-06-20T18:48:45+5:30

लासलगाव : चालू वर्षाच्या खरीप हंगामातील पिक विमा योजना सुरू करण्याची मागणी शेती तज्ञ सचिन होळकर यांनी केली असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृषी मंत्री दादा भुसे तसेच कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना त्याबाबत ई निवेदन सादर केले. तसेच कृषीमंत्री भूसे यांच्यासोबत फोन वरून संपर्क देखील केला असून लवकरच पिकविमा योजना सुरु करण्याचे आश्वासन होळकर यांना दिले.

Demand for introduction of kharif crop insurance scheme | खरीप हंगामातील पिक विमा योजना सुरू करण्याची मागणी

खरीप हंगामातील पिक विमा योजना सुरू करण्याची मागणी

Next
ठळक मुद्देलासलगाव : राज्य शासनाकडे ई निवेदन केले सादर

लासलगाव : चालू वर्षाच्या खरीप हंगामातील पिक विमा योजना सुरू करण्याची मागणी शेती तज्ञ सचिन होळकर यांनी केली असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृषी मंत्री दादा भुसे तसेच कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना त्याबाबत ई निवेदन सादर केले.
तसेच कृषीमंत्री भूसे यांच्यासोबत फोन वरून संपर्क देखील केला असून लवकरच पिकविमा योजना सुरु करण्याचे आश्वासन होळकर यांना दिले.
राज्यामध्ये काही भागात गेल्या अनेक दिवसांपासून चांगला पाऊस पडला असल्याने शेतकऱ्यांनी मका, तूर, सोयाबीन, कपाशी इत्यादी अनेक खरिपाच्या पिकांची पेरणी केली आहे. मात्र या हंगामासाठी पिक विमा काढण्यासाठीची सोय अजून उपलब्ध करु न देण्यात आलेली नाही.
राज्यातील अनेक शेतकरी आॅनलाइन पिकविमा भरण्यासाठी ई-सेवा केंद्रात संपर्क करत आहेत, मात्र सरकारकडून अजुन कोणत्याही प्रकारचा जीआर आलेला नसून पिकविमा काढता येणार नाही अशी माहिती त्यांना मिळत आहे.
सदर परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. मागील वर्षीचा अनुभव पाहता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी पोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ झाला होता. मात्र यावर्षी पिक विमा शेतकºयांना उपलब्ध होतो की नाही अशी साशंकता आहे. याच प्रश्नासाठी सचिन होळकर यांनी संबंधित मंत्र्यांना ई-निवेदन सादर केले. तसेच कृषी विभागातील अनेक वरिष्ठ पातळीवरील अधिकाºयांशी फोनवरून संपर्क करु न त्यांना या बाबत विचारना करून माहीती घेतली.

Web Title: Demand for introduction of kharif crop insurance scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.