बोर्डाच्या परीक्षांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:09 AM2020-12-28T04:09:06+5:302020-12-28T04:09:06+5:30

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी २३ डिसेंबर, २०२० ते ११ जानेवारी, २०२२ पर्यंत दहावीसाठी आणि १५ ...

Demand for issuance of guidelines regarding board examinations | बोर्डाच्या परीक्षांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी

बोर्डाच्या परीक्षांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी

Next

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी २३ डिसेंबर, २०२० ते ११ जानेवारी, २०२२ पर्यंत दहावीसाठी आणि १५ डिसेंबर, २०२० ते ४ जानेवारी, २०२१ पर्यंत बारावीसाठी परीक्षा अर्ज भरण्याची अधिसूचना जारी केली आहे, पण परीक्षेत येणारे प्रश्न शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित असतील की नाही, मार्गदर्शन केलेले नाही. अभ्यासक्रम कमी होईल तर किती? ही परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन असेल, अशा प्रकारच्या अनिच्छेबद्दल पालक, विद्यार्थी, शिक्षक व शाळा चिंतित आहेत. त्यामुळे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्य शिक्षण सचिव वंदना कृष्णा,आणि उपसचिव राजेंद्र पवार यांच्याकडे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेतील अभ्यासक्रम आणि इतर महत्त्वाच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारकडून एक विशेष मार्गदर्शक तत्त्व जारी करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना चिंता दूर करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या पाहिजेत, जेणेकरून विद्यार्थी आणि पालक, शिक्षक यांना परीक्षेच्या तयारीत मदत करता येईल, तसेच विद्यार्थ्यांना काळजी न करता परीक्षा देण्यास मदत होईल, अभ्यासक्रमांबद्दलचा काही संभ्रम दूर होऊन दिलासा मिळेल.

Web Title: Demand for issuance of guidelines regarding board examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.