कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 04:02 PM2020-09-15T16:02:05+5:302020-09-15T16:02:38+5:30
सायखेडा : केंद्र शसनाने अचानक लागू केलेलेली कांद्यावरील निर्यात बंदी त्वरित उठवावी याकरीता राष्टÑवासी युवक कॉँग्रेसच्या वतीने निफाडचे तहसिलदार दिपक पाटील यांना निवेदन देण्यात आले.
सायखेडा : केंद्र शसनाने अचानक लागू केलेलेली कांद्यावरील निर्यात बंदी त्वरित उठवावी याकरीता राष्टÑवासी युवक कॉँग्रेसच्या वतीने निफाडचे तहसिलदार दिपक पाटील यांना निवेदन देण्यात आले.
आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात बहुसंख्य शेतकरी कांदा उत्पादक असून येथे मोठ्या प्रमाणात दर्जेदार कांदा पिक घेतले जाते येथील शेतकऱ्यांची त्यावर अवलंबून असलेल्या व्यापारी वर्गाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही कांद्यावर अवलंबून आहे.
सध्या भरपूर प्रमाणावर कांदा शेतकऱ्यांकडे पडून आहे. व्यापारी वर्गाने खरेदी केलेला कांदा हा निर्यातीसाठी सीमेवर अडकुन पडला आहे. त्यासाठी सीमा खुली करावी. कांद्याच्या किमती खुप वाढल्या नसून अजूनही सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात असल्याने तातडीने निर्यात बंदी उठवने गरजेचे आहे. आधीच लॉकडाउनच्या संकटकाळातुन शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग, वाहतूकदार हे आता कुठे सावरत असतांना ही अचानक केलेली निर्यातबंदी त्यांच्यासाठी घातक ठरेल व त्यांचे मोठे नुकसान होईल, याचा सहानुभूतिपूर्वक विचार करु न आपण कांद्यावरची निर्यातबंदी त्वरित उठवून शेतकरी, व्यापारी, वाहतुकदार यांना दिलासा द्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन म्हटले आहे.
तहसिलदार यांना निवेदन देतांना जि. प.सदस्य सिद्धार्थ वनारसे, सुरेश कमानकर, प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, जिल्हा उपाध्यक्ष इरफान सैय्यद, तालुका अध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, भूषण शिंदे, राजेंद्र कुटे, माणिक कुंदे, बापू गडाख, दिलीप कापसे, नितीन कापसे, निखिल डेर्ले, वाळीबा फडे आदी उपस्थित होते.