नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

By Admin | Published: November 26, 2015 09:44 PM2015-11-26T21:44:25+5:302015-11-26T21:44:56+5:30

तहसीलदारांना निवेदन : बेमोसमी पावसाचा दापूरकरांना फटका

Demand for losses | नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

googlenewsNext

 सिन्नर : तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या बेमोसमी पावसामुळे दापूर भागातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे करण्याची मागणी दापूर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
सोमवार व मंगळवार या दोन दिवशी तालुक्यात बेमोसमी पाऊस झाला. या पावसाने दापूर भागातील द्राक्षबागांचे नुकसान झाले. या पावसामुळे द्राक्षमण्यांना तडे पडून द्राक्षे फुटली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठी धडपड करून द्राक्षबागा वाचविल्या होत्या. या अस्मानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी दापूर येथे ग्रामसभा पार पडली. त्यात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे व्हावे, अशा मागणीचा ठराव ग्रामस्थांनी मंजूर केला. या ठरावाची प्रत व मागणीचे निवेदन तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना देण्यात आले. यावेळी दापूरचे माजी सरपंच सोमनाथ आव्हाड, तुकाराम आव्हाड, बाळासाहेब गामणे, भीमाजी आव्हाड, संभाजी आव्हाड, विष्णू आव्हाड, खंडेराव आव्हाड, संतोष आव्हाड, सरला आव्हाड, योगेश आव्हाड, संजय आव्हाड, रामदास आव्हाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
वडनेर परिसरात नुकसान
मालेगाव तालुक्यातील वडनेर, सातमाने परिसरात बेमोसमी पावसाने द्राक्षबागांचे मोठ्या प्र्रमाणात नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामे करूंन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे बंडूकाका बच्छाव यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वडनेर व सातमाने शिवारात बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटाने हिरावून
नेला. यात प्रामुख्याने बंडूकाका बच्छाव, विनोद जाधव, लखन शिंदे, तर येसगाव येथील तात्या ठाकरे, समाधान अहिरे, गोरख शेलार या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Demand for losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.