शिधापत्रिकेवर खाद्यतेल उपलब्ध करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:14 AM2021-03-05T04:14:25+5:302021-03-05T04:14:25+5:30
सिन्नर : खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने रेशन कार्डावर दरमहा खाद्यतेल उपलब्ध करून देण्यात ...
सिन्नर : खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने रेशन कार्डावर दरमहा खाद्यतेल उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी केली आहे. सिन्नरच्या उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे यांना यासंदर्भात गोसावी यांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन दिले. खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांना रोजच्या भाजीमध्ये खाद्यतेल वापरणे अवघड झाले आहे. तसेच अन्य वस्तूंच्या किमती दररोज वाढत असल्याने जीवन जगणे अवघड झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने रेशन कार्डावर दरमहा खाद्यतेल दिल्यास त्यांना आपला उदरनिर्वाह करणे सोपे होईल असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान गोसावी यांच्याकडून यावेळी तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले. यावेळी सार्थक गोसावी आदी उपस्थित होेते.
----------------
फोटो ओळी- रेशन कार्डवर खाद्यतेल उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी पूजा गायकवाड यांना देताना भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी. समवेत राहुल कोताडे, सागर गोसावी आदी.