शिधापत्रिकेवर खाद्यतेल उपलब्ध करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:13 AM2021-03-06T04:13:52+5:302021-03-06T04:13:52+5:30
ऑनलाईन व्याख्यानाद्वारे महाविद्यालयात मार्गदर्शन सिन्नर : तालुक्यातील दोडी येथील ब्रम्हानंद स्वामी शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी ...
ऑनलाईन व्याख्यानाद्वारे महाविद्यालयात मार्गदर्शन
सिन्नर : तालुक्यातील दोडी येथील ब्रम्हानंद स्वामी शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन व्याख्यान पार पडले. दीपक राऊत यांनी मार्गदर्शन केले.
भोर यांना किनो शिक्षा गौरव पुरस्कार
सिन्नर : तालुक्यातील भलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे दिव्यांग शिक्षक पांडुरंग भोर यांना किनो शिक्षा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. मालेगाव येथील किनो एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. आरिफ पठाण यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. भोर यांनी शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला आहे.
वीजबिलाची दुरुस्ती करण्याची मागणी
सिन्नर : शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करू नये, वाढीव वीजबिलाची दुरुस्ती करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे रामदास आव्हाड, विनायक शेळके, गणेश घुले, बंडूनाना भाबड, शिवाजी दराडे आदी शेतकऱ्यांनी केली. दरेकर हे नांदूरशिंगोटे येथे आले होते, त्यावेळी शेतकऱ्यांनी निवेदन दिले. सध्या शेतकऱ्यांकडून अंदाजे वीजबिले पाठविण्यात येत असल्याने आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
संकल्प कामगार युनियनच्या फलकाचे अनावरण
सिन्नर : तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील नोबेल हायजीन प्रा. लि. कारखान्याच्या परिसरात संकल्प माथाडी कामगार युनियनतर्फे फलकाचे अनावरण करण्यात आले. असंघटित कामगारांच्या भविष्यासाठी युनियन काम करणार असून संकल्प माथाडी युनियनच्या माध्यमातून नोबेल हायजीनमधील १८ कामगारांची नुकतीच नाशिक माथाडी मंडळात नोंद करण्यात आली. संकल्प माथाडी युनियन ही कामगार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे कामगार नेते व युनियन अध्यक्ष राजेश्वर कांगणे यांनी सांगितले. यावेळी चिटणीस संजय सानप, उपाध्यक्ष गौरव घरटे, सरचिटणीस एकनाथ कांगणे, खजिनदार सचिन बर्के, कार्याध्यक्ष पिराजी पवार, शरद बर्के, गणेश शेळके, सदस्य अरूण पवार, संदीप साबळे, संजय सोनवणे आदींसह कामगार उपस्थित होते.