वन्य प्राण्यांसाठी वनतळे तयार करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 06:58 PM2019-03-24T18:58:09+5:302019-03-24T18:58:48+5:30
खामखेडा : चालू वर्षी अल्पशा पावसामुळे डोंगरावर कमी पावसामुळे डोंगरातील जलाशय पावसाआभावी भरले नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडल्याने वास्तव्यात असलेले बिबटे, तरस, लांडगे, वानर आदि हिंस्त्र प्राणी डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात येऊ लागले आहेत.
खामखेडा : चालू वर्षी अल्पशा पावसामुळे डोंगरावर कमी पावसामुळे डोंगरातील जलाशय पावसाआभावी भरले नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडल्याने वास्तव्यात असलेले बिबटे, तरस, लांडगे, वानर आदि हिंस्त्र प्राणी डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात येऊ लागले आहेत.
खामखेडा गावच्या उत्तरेकडील भागामध्ये सावकी शिवार ते कळवण तालुक्यातील मोकभणगी पर्यत डोंगराच्या पर्वत रागा आहेत. या पर्वत रागांच्यामध्ये असलेल्या तिळवण किल्लाजवळ खामखेडा गावाचे बुटीचे रान आहे. या रानात बुटीची विहीर राजेशाही काळात पाण्यासाठी प्रसिद्ध होती. या विहिरीला गेल्या सात-आठ वर्षापर्यत भरपूर पाणी होते. या विहिरित खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या, त्यामुळे जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी विहीरित उतरून पाणी पित असे. परंतु या विहिरीचे कठाडे पडल्यामुळे विहीर दगड मातीने भरल्यामुळे या पर्वत रांगामध्ये बिबटयासह अन्य जंगली प्राण्याचे प्रभाव क्षेत्र आहे. या उन्हाच्या तडाख्यामुळे डोंगर,दऱ्यामघील पाण्याचे जलस्रोत आटल्याने डोंगरामध्ये पाणी नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात डोंगर पायथ्याजवळी मळयातील वस्तीवर रात्रीच्या वेळेस येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वन विभागाने या वन्यप्राण्यांसाठी डोंगरामघ्ये कोणत्याही प्रकारची पाण्यासाठी वनतळे तयार केली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस हे वन्यप्राणी परिसरात रात्री भक्ष्याच्या व पाण्याकरीता गावात फिरतात व सकाळी उजाडण्यापूर्वी पुन्हा डोंगराच्या कडेकपारीत विश्रांतीसाठी निघून जातात.
मागबारी घाटातून राज्य महामार्ग आसल्याने या घाट परिसरात बर्याच दिवसापासून बिबट्याच्या मादीचे वास्तवे होते. तेव्हा अनेक वेळा रात्रीचे प्रवास करणाºया वाहन धारकाना या बिबट्याचे दर्शन होत होते. या घाटातून वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. गेल्या दोन वर्षांपूवी मांगबारी घाटात रात्रीच्या वेळेस अन्न, पाण्याच्या शोधात फिरत आलेल्या बिबट्याच्या मादीला रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्या ठार झाला होता.
आता तरी वनविभागाकडून या वन्य प्राण्यासाठी डोंगरात पाण्यासाठी वनतळे, किंवा पुरातन शिवकालीन बुटीच्या विहिरींच्या दुरस्ती केल्यास तेथे वन्य प्राण्याची पाण्याची व्यवस्था होण्यास मदत होणार आहे. या बुटीच्या विहिरीला उन्हाळयात पाणी असते. तेव्हा वनविभागाने वन्य प्राण्यासाठी जंगला वनतळे व बुटीच्या विहिरिची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.