ग्रामीण भागात मास्क, सॅनिटायझरला मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 09:51 PM2020-03-28T21:51:29+5:302020-03-29T00:23:54+5:30
नांदूरशिंगोटे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. स्वच्छता राखण्यासाठी हात वारंवार धुण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर व मास्कची मागणी वाढली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वारंवार हात धुण्यासाठी हँडवॉशचा वापर होतो आहे. पण सॅनिटायझर अनेक दुकानांत उपलब्ध नाही. अचानक मागणी वाढल्यामुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे. संसर्ग टाळण्यासाठी तोंडाला मास्क बांधण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. परंतु मास्कची अचानक मागणी वाढल्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. शहरांमध्ये मागणी वाढल्याने हा मास्क ग्रामीण भागात वेळेवर उपलब्ध होत नसल्याने मास्कचा पुरवठा सध्या बंद आहे. हा मास्क बाजारात साधारण १४० ते १५० रु पयांना मिळतो. परंतु, मास्क उपलब्ध असल्याने अन्य पर्याय उपलब्ध आहेत. काही जण साधा रु मालाचा वापर करत असल्याचे चित्र आहे. हिरव्या रंगाचे मास्क बाजारात दाखल होऊ लागले आहेत. ग्रामीण भागात टेलर्स हिरवे मास्क शिऊन देत आहेत. हे मास्क वापरण्यास योग्य आहेत. परंतु, ते दररोज धुवूनच वापरावे,असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.