पेठ तालुक्यात एकाधिकार धान्य खरेदी केंद्राची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:14 AM2021-02-10T04:14:33+5:302021-02-10T04:14:33+5:30
आदिवासी विकास महामंडळाचे संचालक तथा माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची ...
आदिवासी विकास महामंडळाचे संचालक तथा माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पेठ तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने शेतकऱ्यांना भात, नागलीसह इतर धान्य विक्रीसाठी शासनाच्या खरेदी केंद्रावर अवलंबून रहावे लागते. सद्यस्थितीत तालुक्यात जोगमोडी व करंजाळी ही दोनच केंद्रे सुरू असून एकेका केंद्राला १०० पेक्षा जास्त गावे जोडली आहेत. त्यामुळे ३० ते ४० किलोमीटर अंतर पायपीट करीत धान्य आणावे लागते. म्हणून पेठ, कोहोर, पाटे, भुवन आदी ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी संचालक धनराज महाले, शेतकरी रामदास वाघेरे, भिका चौधरी, अंबादास सातपुते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
इन्फो...
जाचक अटी रद्द कराव्यात
आदिवासी विकास महामंडळाने धान्य खरेदी करताना अनेक प्रकारच्या अटी व शर्ती लादल्या असून पूर्व नोंदणी करणे, सातबारा उतारा सादर करणे, क्षमतेपेक्षा अधिक धान्य न आणणे आदींचा समावेश आहे. शिवाय धान्य विक्रीनंतर दोन दोन महिने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत नसल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याचा आधार घ्यावा लागत असून शासनाने घालून दिलेल्या जाचक अटी रद्द करून खासगी व्यापारी वर्गापासून होणारी लूट थांबवावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
===Photopath===
090221\09nsk_3_09022021_13.jpg
===Caption===
पेठमध्ये एकाधिकार धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना देतांना धनराज महाले,रामदास वाघेरे, भिका चौधरी, अंबादास सातपुते आदी.