पावसाळ्यात अधिक वीज मिळण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 06:31 PM2019-06-13T18:31:15+5:302019-06-13T18:32:20+5:30

द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाला सुरु वात झाली असून, निफाड परिसरात जूनच्या पहिल्याच आठवड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरु वात झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी या पावसामुळे दोन दिवसांत विजेचे खांब व वीजपुरवठा करणाºया साधन सामग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Demand for more electricity during monsoon | पावसाळ्यात अधिक वीज मिळण्याची मागणी

पावसाळ्यात अधिक वीज मिळण्याची मागणी

Next

वनसगाव : द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाला सुरु वात झाली असून, निफाड परिसरात जूनच्या पहिल्याच आठवड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरु वात झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी या पावसामुळे दोन दिवसांत विजेचे खांब व वीजपुरवठा करणाºया साधन सामग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सोमवारी सायंकाळी कोळवाडी रोडलगत मोठ्या प्रमाणात झाडे वीज खांबांवर पडून वीजपुरवठा काही काळ बंद होता.
सध्या पावसाचे दिवस सुरू झाले असून, मोठ्या प्रमाणात वस्तीवर लोक राहतात. प्राणिमात्रांची देखील भीती असून, वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये म्हणून आवश्यक ती कार्यवाही करून वेळेत विजेचे नियोजन करावे अशी मागणी निफाड सोसायटीचे माजी चेअरमन रमेश जाधव यांनी केली आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध करून द्यावी तसेच ज्या ठिकाणी खांबावरील दिवे बंद आहे ते दुरु स्त करून चालू करावे. वाकलेले खांब सरळ करून तुटलेल्या तारादेखील तातडीने जोडण्यात याव्या, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

Web Title: Demand for more electricity during monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.