किदवाईरोड स्मारकावर शहिदांचे नाव टाकण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:13 AM2021-01-15T04:13:43+5:302021-01-15T04:13:43+5:30
निवेदनात म्हटले आहे की, मालेगाव महापालिका शहराच्या सात शहिदांचे नाव टाकण्याबाबत अर्ज दिला होता; परंतु अद्याप कार्यवाही ...
निवेदनात म्हटले आहे की, मालेगाव महापालिका शहराच्या सात शहिदांचे नाव टाकण्याबाबत अर्ज दिला होता; परंतु अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही. राजपत्रात मालेगावच्या सात शहिदांची नावे लिहिलेली आहेत. पुण्याच्या येरवडा तुरुंगात सर्व सात पुरुष होते. त्या शहिदांच्या वारसांना शासनाने पेन्शन व इनाम जमीन दिली होती. त्याच्या कुटुंबीयांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून दाखविले आहे. इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध १९२१ मध्ये त्यांच्याशी लढले. या दरम्यान टिळक रोडवर एका इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारले. यात मालेगावच्या सात शहिदांना गळफास देण्यात आला. यामुळे किदवाईरोडवरील स्मारकावर शहिदांची नावे टाकण्यात यावी. निवेदनावर अध्यक्ष रिजवान बॅटरीवाला, यासेर अरीफ, मोहंमद फैजान, जवीद अख्तर, मोहंमद रिजवान, इस्तयाक अन्सारी,अमीन शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.