नाशिकरोड-त्र्यंबकेश्वर मेट्रोची मागणी
By Admin | Published: January 28, 2017 12:59 AM2017-01-28T00:59:53+5:302017-01-28T01:00:04+5:30
नाशिकरोड-त्र्यंबकेश्वर मेट्रोची मागणी
नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी नेमके काय पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलविलेल्या बैठकीत दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाशिकरोड - त्र्यंबकेश्वरदरम्यान मेट्रो रेल्वे सेवेची मागणी केली.
नाशिक - सुरत रेल्वेसेवा सुरू करण्याची नाशिककरांची मागणी आहे. अर्थसंकल्पात या रेल्वेमार्गाचा समावेश करावा. तसेच नाशिक ते डहाणूदरम्यान लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी. मनमाड ते शिर्डी, कोल्हापूरची देवी, दक्षिणेतील सत्य साईबाबांच्या तीर्थस्थळापर्यंत विशेष रेल्वेमार्ग तयार करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर त्र्यंबकेश्वरला रेल्वसेवेने जोडण्यासाठी नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर दरम्यान मेट्रो रेल्वे सुरू करावी. अत्याधुनिक नाशिक विमानतळ सुरू करण्यासाठी आवश्यक ते नियोजन अर्थसंकल्पात करावे. कांद्याला किमान दोन हजार रुपये हमिभाव देण्यासाठी तरतूद करावी यांसह विविध मागण्यांचा समावेश असलेले निवेदन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. (प्रतिनिधी)