पुण्यातील भिडे वाड्याचे राष्टÑीय स्मारक करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 10:40 PM2020-01-02T22:40:20+5:302020-01-02T22:40:43+5:30
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली ती पुण्यातील बुधवार पेठेतील तात्याराव भिडे यांच्या वाड्यात. त्या भिडेवाड्याचे सुशोभीकरण करून त्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी अध्यापकभारती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येवला : महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली ती पुण्यातील बुधवार पेठेतील तात्याराव भिडे यांच्या वाड्यात. त्या भिडेवाड्याचे सुशोभीकरण करून त्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी अध्यापकभारती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शतकानुशतके अज्ञानाच्या अंध:कारात खितपत पडलेल्या स्रियांना ज्ञानप्रकाश देण्याचे धाडस फुले दांपत्याने केले. भिडे वाड्यात ज्ञानदीप तेवला. स्रीशिक्षणाची सुरुवात तेथून झाली; पण ते स्थळ दुर्लक्षित राहिले आहे. त्यामुळे भिडे वाड्याला वाचविण्यासाठी, त्याचे संरक्षण, संवर्धन होण्यासाठी तेथे एक संग्रहालय व्हावे. तसेच भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर अध्यापक भारतीचे शरद शेजवळ, राजरत्न वाहुळ, सुरेश खळे, मयूर सोनवणे, अभिमन्यू शिरसाठ, अमरिश सोनवणे, दादाभाऊ सोनवणे आदींच्या सह्या आहेत.