मालेगावी कोराेना नियंत्रणासाठी नवीन आयुक्तांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:10 AM2021-03-29T04:10:02+5:302021-03-29T04:10:02+5:30
पत्रात म्हटले आहे की, २८ एप्रिल २०२० मध्ये मालेगाव शहर कोरोना चे हॉटस्पॅाट ठरले असताना शासनाच्या निर्णयानुसार मालेगाव मनपाच्या ...
पत्रात म्हटले आहे की, २८ एप्रिल २०२० मध्ये मालेगाव शहर कोरोना चे हॉटस्पॅाट ठरले असताना शासनाच्या निर्णयानुसार मालेगाव मनपाच्या आयुक्त पदाचा मदभार मी स्वीकारला होता. जनतेच्या सहकार्याने मालेगाव पॅटर्न राबवला. मनपात पदाधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार कामे करू शकत नसल्याने माझ्याविरूद्ध अविश्वास ठराव संमत झालेला आहे. ठरावात माझे आयुक्त म्हणून असलेले अधिकार काढून घेणेबाबतची उपसूचना मंजूर करण्यात आली आहे. सध्या मालेगावात कोेरोनाचे रुग्ण वाढत असून पाचशेच्यावर रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटीलेटरवर आहेत. मला प्रशासनाचे सहकार्य मिळणे अवघड आाहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना मनपाकडून अत्यावश्यक सेवा देण्यात अडचणी निर्माण होऊन अनर्थाची परिस्थती निर्माण होऊ शकते. त्यामुळे अत्यावश्यक बाब समजून मालेगावी त्वरित नवीन अधिकाऱ्याची आयुक्तपदी नियुक्ती करावी, पत्राची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे.