जिल्हा बॅँकेची शाखा बंद न करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 09:20 PM2020-08-04T21:20:22+5:302020-08-05T01:10:05+5:30
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील नाशिक जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची शाखा बंद करू नये, अशी मागणी सर्वतीर्थ टाकेदच्या सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील नाशिक जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची शाखा बंद करू नये, अशी मागणी सर्वतीर्थ टाकेदच्या सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.
सर्वतीर्थ टाकेद हे इगतपुरी तालुक्यातील घोटीनंतर सर्वात मोठी बाजारपेठ असलेले गाव असून, गावाला अनेक वाड्या व गावे जोडली आहेत. येथील बाजारात दररोज मोठी आर्थिक उलाढाल सुरू असते. गावात एनडीसीसी बँक वगळता कुठलीही पतसंस्था अथवा बँक नाही तसेच परिसरातही जवळपास कुठेही बँक उपलब्ध नसल्याने बँकेचे व्यवहार करण्यासाठी या शाखेशिवाय पर्याय नाही. येथील व्यापारीवर्ग आपले सर्व आर्थिक व्यवहार याच बँकेमध्ये करतात. त्यामुळे येथील बँकेची शाखा बंद करण्यात आली तर या व्यापाऱ्यांना आपले आर्थिक व्यवहार करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बँक शाखा बंद करू नये, अशी मागणी ग्रामपंचायतीसह व्यापारीवर्गाने केली आहे. टाकेद येथील एनडीसीसी बँक शाखेत परिसरातील अनेक व्यापारी, दुकानदार, सर्वसामान्य नागरिक यांच्यासह शेतकऱ्यांचा घामाचा पैसा अडकलेला आहे. त्यात टाकेद हे मध्यवर्ती ठिकाण व प्रमुख बाजारपेठ असल्याने परिसरात या बँक शाखेशिवाय दुसरी बँक नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांना या एकमेव शाखेशिवाय पर्याय नाही.
- ताराबाई बांबळे, सरपंच,
टाकेद बु।।