उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे

By admin | Published: May 26, 2017 12:08 AM2017-05-26T00:08:02+5:302017-05-26T00:08:22+5:30

जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीच्या (टीडीएफ) तसेच अन्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. २५) जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आंदोलन केले.

Demand office | उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे

उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राजकीय दबावामुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची (एनडीएसटी) निवडणूक लांबणीवर टाकली जात असल्याचा आरोप करत जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीच्या (टीडीएफ) तसेच अन्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. २५) जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आंदोलन केले. दरम्यान, न्यायालयाची सुनावणी होऊन ५ जूनपर्यंत पतसंस्थेच्या निवडणुकीविषयी निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन जिल्हा उपनिबंधकांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम त्वरित प्रसिद्ध करण्याच्या मागणीसाठी टीडीएफच्या तसेच अन्य विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. २५) दुपारी जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्यासोबत चर्चा केली.

Web Title: Demand office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.