नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य् पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:16 IST2020-09-28T22:35:29+5:302020-09-29T01:16:11+5:30
निफाड : आक्टोंबर ते जानेवारी या काळात नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात स्थानिक व स्थलांतरीत देशी-विदेशी पक्षी व पर्यटक भेट देतात त्यामुळे पक्षी अभयारण्य आक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करावे अशी मागणी निफाड येथील पक्षीमित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ.उत्तम डेर्ले यांनी केली आहे.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य् पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी
निफाड : आक्टोंबर ते जानेवारी या काळात नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात स्थानिक व स्थलांतरीत देशी-विदेशी पक्षी व पर्यटक भेट देतात त्यामुळे पक्षी अभयारण्य आक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करावे अशी मागणी निफाड येथील पक्षीमित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ.उत्तम डेर्ले यांनी केली आहे. याबाबत ते म्हणाले की जागतिक मान्यता प्राप्त "रामसर परीसर " असे नांदुरमधमेश्वर पक्षीअभयारण्य करोना या जागतिक महामारीमुळे 6 महीन्यांपासुन पर्यटनासाठी बंद असुन पक्षीतज्ञ,पक्षी-वन्यजीव निसर्गपर्यावरण प्रेमी यांना पक्षी निरीक्षणाचा लाभ घेणे बंद झाले आहे व या अभयारण्यातील गाईड,वनकमर्चारी,वनमजुर,यासह अनेकांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळून उपजीविकेवर गंडातर आले आहे. आक्टोंबर ते जानेवारी या काळात या अभयारण्यात स्थानिक व स्थलांतरीत देशी-विदेशी पक्षी व पर्यटक भेट देतात यामुळे येथील अनेक घटकांचा उदरनिर्वाह होतो ,पक्षी-वन्यजीव-निसर्ग-पर्यावरण प्रेमी पर्यटनासाठी हि पवर्णीच असते याचा आनंद घेता यावा म्हणून पक्षीप्रेमींसाठी व पर्यटकासाठी पक्षी अभयारण्य खुले करावे अशी विनंती डेर्ले यांनी केली आहे. अभयारण्य सुरू केल्यास परीसराचा आर्थिक विकास होऊन सर्व घटकांना फायदा होऊन आर्थिक गाडी रुळावर येईल त्यामुळे पक्षी अभयारण्य ओक्टॉम्बरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करावे अशी मागणी डेर्ले यांनी केली आहे