कांदा निर्यात खुली करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 04:07 PM2020-09-17T16:07:56+5:302020-09-17T16:09:31+5:30
कळवण : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केल्याने कांदा उत्पादक शेतक?्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ बंद केलेली कांदा निर्यात मागे घ्यावी अशी मागणी कळवण तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार बी ए कापसे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कळवण : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केल्याने कांदा उत्पादक शेतक?्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ बंद केलेली कांदा निर्यात मागे घ्यावी अशी मागणी कळवण तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार बी ए कापसे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यातील अनेक शेतक?्यांनी उन्हाळी (गावठी ) कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे चाळीमध्ये 50 टक्के कांदा सडला आहे. त्यामुळे कांद्यचे दर थोडे वाढले आहेत. त्यामुळे शेतक?्यांना झालेल्या नुकसानीचे दर वाढल्यामुळे थोडासा दिलासा मिळालं होता. केंद्र शासनाने अचानक कांदा निर्यात बंद केल्याने भाव कमी झाले आहेत. कांदा उत्पादक शेतक?्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
कांदा बाजारभाव कमी करावा अशी कुठल्याही वर्गाची मागणी नसताना केंद्र शासनाने निर्यात बंद केल्याने शासनाच्या निणर्याचा आम्ही निषेध करत असून तात्काळ निर्यात खुली करून कांदा उत्पादक शेतक?्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कळवण तालुका शिवसेच्यावतीने तहसीलदार बी ए कापसे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, दशरथ बच्छाव, कारभारी आहेर, संभाजी पवार,साहेबराव पगार, विनोद भालेराव, डॉ दिनेश बागुल, शितलकुमार अहिरे, डॉ पंकज मेणे, किशोर पवार,ललित आहेर, संजय रौंदळ, विनोद मालपुरे, आप्पा बुटे, मुन्ना हिरे, सुनील पगार, निलेश बोरसे, आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.