धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:37 PM2020-08-22T22:37:22+5:302020-08-23T00:25:49+5:30
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. गेल्या चार महिन्यापासून धार्मिक स्थळे बंद असल्याने यावर अवलंबून असलेले व्यावसायिक, विक्रेते, रिक्षाचालक, हॉटेल व्यावसायिक यांच्यावर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. गेल्या चार महिन्यापासून धार्मिक स्थळे बंद असल्याने यावर अवलंबून असलेले व्यावसायिक, विक्रेते, रिक्षाचालक, हॉटेल व्यावसायिक यांच्यावर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे. असे असले तरी सर्वसामान्यांची भावना लक्षात घेता शासनाने धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी श्रीमंतयोगी सांस्कृतिक शैक्षणिक कला, क्रीडा, युवा मंडळाने केली आहे. शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांविषयी अटी शर्ती घालून मंदिरे खुली करण्यास परवानगी देण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व सामन्याचे रोजगार पुन्हा सुरू होण्यास मदत होऊ शकेल असेही श्रीमंत योगी सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा युवा मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.