शिक्षक संघटनेची मागणी : बीएलओंच्या कामाचे करा नियोजननिवडणूक अधिकाºयांवर गुन्हे दाखल करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:07 AM2017-12-05T01:07:36+5:302017-12-05T01:09:08+5:30
नाशिक : प्राथमिक शिक्षकांनाच बीएलओ म्हणून नेमणूक देऊन त्यांच्याकडून मतदार यादीचे काम करवून घेतले जाते व कामात चुका झाल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते, त्याच धर्तीवर कामात चुका झालेल्या निवडणूक अधिकाºयांवरही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिक्षक संघटनेने केल्याने शिक्षक व महसूल खाते यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.
सोमवारी या संदर्भात महाराष्टÑ राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या पदाधिकाºयांनी उपजिल्हा निवडणूक अधिकाºयांची भेट घेऊन त्यांना शिक्षकांच्या मागण्या व त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल दोनपानी निवेदन सादर केले आहे. त्यात म्हटले आहे की, बीएलओंच्या कामाचे कोणतेही नियोजन केले जात नाही, शैक्षणिक काम आटोपल्यावर त्यांच्यावर मतदार यादीचे काम सोपविण्यात आले असले तरी, शिक्षकांना त्यांची शैक्षणिक कामे शाळा आटोपल्यानंतरच करावी लागतात. कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राध्यापक व माध्यमिक शिक्षकांना प्राथमिक शिक्षकांच्या मानाने कमी कामे असतात, त्यांना मतदार यादीचे काम का दिले जात नाही. मुळात प्राथमिक शिक्षकांकडे संपूर्ण वर्गाची जबाबदारी असते त्यांना बीएलओ बैठकांसाठी जाताना शाळा वाºयावर सोडावी लागते व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते, त्याचाही विचार व्हावा. शिक्षकांनाच करावी लागतील कामेदरम्यान, शिक्षक आमदार कपील पाटील यांनी भारत निवडणूक आयोगाकडे शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याबाबत केलेल्या पत्रव्यवहाराला निवडणूक आयोगाने उत्तर दिले असून, उत्तर प्रदेशीय प्राथमिक शिक्षक संघाने उत्तर प्रदेश सरकारविरुद्ध केलेल्या न्यायालयीन लढ्यात न्यायालयाने शिक्षकांनाच निवडणुकीसंदर्भातील कामे करावी लागतील, असा निवाडा दिल्याचे पत्रच पाटील यांना पाठविले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामातून शिक्षकांची भविष्यातही सुटका होणे कठीण आहे.