मुक्त विद्यापीठात पाली भाषा अभ्यासक्रमाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:17 AM2021-08-21T04:17:57+5:302021-08-21T04:17:57+5:30
दरम्यान, मुक्त विद्यापीठ पाली भाषा प्रमाणपत्र शिक्षणक्रम (सहा महिने) सुरू करत आहे. याबद्दल संस्थेने विद्यापीठाचे स्वागत केले असून, भारत ...
दरम्यान, मुक्त विद्यापीठ पाली भाषा प्रमाणपत्र शिक्षणक्रम (सहा महिने) सुरू करत आहे. याबद्दल संस्थेने विद्यापीठाचे स्वागत केले असून, भारत भूमीतील ही ज्ञानभाषा विद्यापीठातून शिकवणार असल्याने अभ्यासकात आनंद व्यक्त केला जात असल्याचे सदर निवेदनात अध्यापक भारती, लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरद शेजवळ यांनी म्हटले आहे.
सदर अभ्यासक्रम केवळ सहा महिन्यांचा शॉर्ट कोर्स इतक्यावर न थांबता पाली भाषा अभ्यासू पाहणाऱ्या ज्ञानार्थींना शिकण्यासाठी पाली भाषा पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम तातडीने सुरू करावा, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.
निवेदनावर शरद शेजवळ, महेंद्र गायकवाड, शैलेंद्र वाघ, वनिता सरोदे, अमीन शेख, सुरेश खळे, सुभाष वाघेरे, मिलिंद गुंजाळ, प्रा.मिलिंद गांगुर्डे, सुनील खरे, राजरत्न ओहळ, नीलिमा गाडे, अक्षय गांगुर्डे, अभय लोखंडे, प्रशिल शेजवळ, भारती बागुल, दीपक शिंदे, नितीन केवटे, कामिनी केवट, अतुल डांगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.