बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:15 AM2021-09-18T04:15:27+5:302021-09-18T04:15:27+5:30

प्रा. नितीन लालसरे यांची चांदवड येथे संजय जाधव यांनी भेट घेऊन त्यांना सदर निवेदन दिले. यावेळी ...

Demand for panchnama of damage by going to the dam | बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

Next

प्रा. नितीन लालसरे यांची चांदवड येथे संजय जाधव यांनी भेट घेऊन त्यांना सदर निवेदन दिले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर, शिवसेना शहरप्रमुख संदीप उगले, पप्पू कोतवाल, दिपांशू जाधव, कैलास सावकार, कचरू केदारे, कमलेश पवार उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे. यावर्षी नैसर्गिक व शेतीमालास बाजारभाव नसल्याने शेतकरी पूर्ण हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन सरसकट पंचनामे करून एकरी ५० हजार अनुदान मिळावे. तसेच शेततळे योजना, कांदा चाळ योजनेचे अनुदान अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाही. शासकीय योजनांच्या फाईली प्रलंबित आहेत. याबाबत संबंधित कार्यालयास सूचना व्हाव्यात. फळबागांचे देखील ड्रोनद्वारे सर्वेक्षण/पंचनामे करुन अनुदान मिळावे, कांदा शेतीमालास कमीत कमी ३ हजार रुपये हमीभाव मिळावा. कांद्यास ५०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे अनुदान जाहीर करावे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमती वाढल्यामुळे महागाई वाढलेली आहे. त्यावर नियंत्रण असावे, आदी प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

फोटो- १७ चांदवड काँग्रेस

शेतकऱ्यांसबंधी विविध मागण्यांचे निवेदन प्रा. लालसरे यांना देताना चांदवड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय जाधव. समवेत नितीन आहेर, संदीप उगले, पप्पू कोतवाल, दिपांशू जाधव, कैलास सावकार, कचरू केदारे आदी.

170921\17nsk_18_17092021_13.jpg

 फोटो- १७ चांदवड काँग्रेस शेतकऱ्यांसबंधी विविध मागण्यांचे निवेदन प्रा. लालसरे यांना देताना चांदवड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय जाधव. समवेत नितीन आहेर,  संदीप उगले,पप्पु कोतवाल,दिपांशु जाधव,कैलास सावकार,कचरू केदारे आदी. 

Web Title: Demand for panchnama of damage by going to the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.