कंत्राटदारांची देयके देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:15 AM2021-04-02T04:15:03+5:302021-04-02T04:15:03+5:30
कळवण : गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारेसह सर्व विभागात कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देयके देण्याबाबत व निधीची तरतूद ...
कळवण : गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारेसह सर्व विभागात कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देयके देण्याबाबत व निधीची तरतूद करण्यात महाविकास आघाडी सरकारने मुद्दामहून चालवलेली चेष्टा तातडीने थांबवून कंत्राटदारांची देयके द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भरत वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे . महाराष्ट्रातील सर्व विभागांकडे अंदाजे तीन लाख कंत्राटदार राज्यात विकासाची कामे करीत आहेत. राज्याचा विकासाचा अत्यंत महत्त्वाचा घटक कंत्राटदार आहे . मार्च २०२०मध्ये अचानक लॉकडाऊन व कोरोनाची परिस्थिती उद्भवली. त्यावेळी राज्यांतील कंत्राटदारांची देयके शासनाने दिली नाहीत, तरी मुख्यमंत्री निधीस सगळ्यात जास्त सहकार्य करुन आपली योग्य भूमिका साकारली आहे. शासन मात्र देयके देण्याची काहीही कार्यवाही करीत नाही. सगळ्यात जास्त कर शासनाकडे जमा करणारा घटक हा कंत्राटदार आहे. कोरोनाचे कारण दाखवून जाणीवपूर्वक राज्यातील कंत्राटदारांना खड्ड्यात घालून गाडण्यासाठी अटोकाट प्रयत्न करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.