जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतून पैसे देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:07 AM2018-03-09T00:07:06+5:302018-03-09T00:07:06+5:30
मालेगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतून ठेवीदारांचे पैसे आता तरी मिळतील का, असे निवेदन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांना सामाजिक कार्यकर्ते प्रा. रवींद्र मोरे यांनी दिले आहे.
मालेगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतून ठेवीदारांचे पैसे आता तरी मिळतील का, असे निवेदन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांना सामाजिक कार्यकर्ते प्रा. रवींद्र मोरे यांनी दिले आहे. नोटाबंदी करण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले त्या दिवसापासून आजतागायत ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत. नोटाबंदी निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती बॅँकेला लागलेली साडेसाती अद्यापही सुटण्यास तयार नाही. ठेवीदारांचे पैसे अजून मिळत नसल्याने खातेदार तसेच शिक्षकांचे वेतन दोन ते तीन महिन्यांचे पगाराची रक्कम अडकली असून, ती मिळत नसल्याने अनंत अडचणींना खातेदारांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामीण भागातील खातेदारांना ग्रामीण भागातील बॅँका आठ किंवा दहा दिवसांनंतर दोन हजार, तर कधी तीन हजार रुपये देत आहे.