वसाका ऊस उत्पादकांना पेमेंट देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:35 PM2019-03-19T23:35:36+5:302019-03-20T01:02:41+5:30
सटाणा, देवळा, कळवण व मालेगाव कार्यक्षेत्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला सन २०१८-१९ या काळात ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे ऊस पेमेंट अद्याप मिळालेले नसून सरकारने तत्काळ अदा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी प्रभाकर पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कळवण : सटाणा, देवळा, कळवण व मालेगाव कार्यक्षेत्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला सन २०१८-१९ या काळात ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे ऊस पेमेंट अद्याप मिळालेले नसून सरकारने तत्काळ अदा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी प्रभाकर पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर शासन नियुक्त प्राधिकृत मंडळ नियुक्त करण्यात आले होते; मात्र सन २०१६-१७ या काळात कारखाना बॉयलर पूजन करूनही बंद राहिला. कारखान्याचे ऊस उत्पादक, कामगार यांचे मोठे नुकसान झाले होते. हा कारखाना सन २०१८-१९ या काळात उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखाना युनिट-१ चे अध्यक्ष अभिजित पाटील यांना भाडेतत्त्वावर करार करून चालविण्यास दिला आहे. चालू हंगामाच्या गव्हाण पूजनवेळी कादवा व द्वारकाधीश साखर कारखाने जो भाव देतील त्यापेक्षा १ रु पया जास्त भाव देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते; मात्र कारखान्याकडून काही शेतकऱ्यांना २ हजार अॅडव्हान्स पेमेंट केले तर काहींना पेमेंटच केले नाही. बहुतांशी शेतकºयांना धनादेश देण्यात आले आहेत; मात्र कारखान्याच्या खात्यात शिल्लक रक्कम नसल्याने धनादेश वटले नाहीत. त्यात कारखाना चालविणारा करारधारक बेपत्ता झाला असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. देणे देण्यास जबाबदार यंत्रणेमार्फत शोधून शेतकºयांच्या उसाचे पेमेंट अदा करण्यास भाग पाडावे अशी मागणी निवेदनात प्रभाकर पाटील यांनी केली आहे.