कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमणुकीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:15 AM2021-04-08T04:15:28+5:302021-04-08T04:15:28+5:30
सातपूरला डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त नाशिक : शहरातील अनेक भागांत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सायंकाळच्या वेळी नागरिकांना त्याचा ...
सातपूरला डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त
नाशिक : शहरातील अनेक भागांत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सायंकाळच्या वेळी नागरिकांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या धूर फवारणीच्या गाड्या काही भागांपर्यंत पोहोचत नसल्याने, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, महापालिकेने याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
जुने नाशिकला धूरफवारणीची मागणी
नाशिक : जुने नाशिक परिसरात डासांचा उपद्रव वाढल्याने परिसरात धूरफवारणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने आणि उघड्या गटारी असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिसरात प्रादुर्भाव वाढला असून, रुग्णसंख्या वाढत असल्याने या भागात दर आठवड्यात धूरफवारणी करण्याची मागणी होत आहे.
बेशिस्त नागरिकांवर कारवाईची मागणी
नाशिक : शहराच्या गल्लीबोळात अनेक ठिकाणी नागरिक, तसेच मास्कही न घालता रस्त्यावरुन वावरत आहेत. विशेेषत्वे जुने नाशिक आणि पंचवटीतील लहान गल्ल्यांमध्ये अशा प्रकारचे बेशिस्त नागरिक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. या बेशिस्त नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
सायकल ट्रॅक खुला करावा
नाशिक : शहरातील त्र्यंबक रोड परिसरात बांधण्यात आलेल्या सायकल ट्रॅकचे कामकाज पूर्ण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सध्याच्या निर्बंधाच्या काळात हा ट्रॅक नागरिकांना खुला केल्यास सायकलप्रेमींना त्यावर सकाळ, संध्याकाळ सायकल चालविणे शक्य होणार आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर सुरू करावा, अशी सायकलप्रेमींची इच्छा आहे.